मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिज्म कॉरपोरेशन (IRCTC)च्या शेअर्समध्ये सलग दोन दिवस मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आयआरसीटीसीचा शेअर रेकॉर्ड हायवरून 31 टक्क्यांनी घसरला आहे. हा शेअर काल 20 टक्क्यांनी घसरून 4377 रुपयांवर आला होता. नंतर यामध्ये रिकवरी झाली आणि आज सकाळी 11 वाजेदरम्यान 4696 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. आयआरसीटीसीने गेल्या 2 वर्षात 20 ट्क्क्याहून अधिक परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची की नाही याबाबत जाणून घेऊ या स्ट्रॅटेजी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 दिवसांपासून बदलली शेअर्सची चाल
मंगळवारी सुरूवातीच्या व्यवसायामध्ये IRCTCचा स्टॉकमध्ये शानदार तेजी दिसून आली होती. शेअर 6396 रुपयांच्या रेकॉर्ड हाय किंमतीवर पोहचला होता. नंतर शेअरमध्ये मोठी घसरण पाहयला मिळाली. रेकॉर्ड हायवरून 31 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. आज हा शेअर 4518 रुपयांवर ट्रेड करीत आहे.


स्टॉकमध्ये गुंतवणूकीची स्ट्रटेजी
Swastika Investmart चे रिसर्च हेड, संतोष मीना यांनी म्हटले की, IRCTC च्या स्टॉकचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. हा स्टॉक 14 ऑक्टोबर 2019 मध्ये लिस्ट झाला होता. 4000-3800 रुपयांच्या आसपास खरेदी स्टॉक करता येईल. ही लेवल क्रिटिकल डिमांड झोन आहे. दीर्घ काळासाठी होल्ड केल्यास गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळू शकतो.