IRCTC वर तिकीट बुक न होताही अकाऊंटमधून पैसे गेले? पाहा आता ते परत कसे मिळवाल
पैसे गेले असा बोभाटा आपण करतो. असं करण्यापूर्वी ही बातमी वाचा
IRCTC Ticket Booking: आयारसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करताना अनेकदा असं होतं की तिकीट बुक होत नाही, पण खात्यातून पैसे मात्र कमी होतात. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं, हेच आपल्याला कळत नाही. मग काय? पैसे गेले... पैसे गेले असा बोभाटा सुरु होतो.
पैसे गेले खरे, पण ते परत कसे मिळवावेत यावरही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं. पैसे खात्यातून कमी झाले असले तरीही ते कुणी लंपास केले नाहीत हे इथं लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
Payment Options On IRCTC
आयआरसीटीसीकडून प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीनं तिकीट बुकींग आणि रद्द करण्याचे पर्याय दिले जातात. इथं पैसे भरण्यासाठीही विविध पर्याय उपलब्ध असतात. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार हे पर्याय निवडू शकतं.
तिकीट बुकींग आणि पैसे भरण्यासाठी आयआरसीटीसीकडून नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ई वॉलेट, डिजीटल वॉलेट असे पर्याय वापरले जातात.
पैसे जाऊनही तिकीट बुक न झाल्यास
अनेकदा तिकीट ऑनलाईन पद्धतीनं बुक करताना युजर्सना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कारण प्रत्येक सेकंदाला इथं हजारोंच्या संख्येनं प्रवासी तिकीट बुक करत असतात.
कित्येकदा तर, खात्यातून पैसे कमी होतात मात्र तिकीट बुक झालेली नसते. असं तेव्हा होतं जेव्हा कोणी एक प्रवासी बुकिंगच्या वेळी बर्थ निवडतो पण, बर्थ नसल्यामुळं तिकीट मात्र बुक होऊ शकत नाही.
नेटवर्क मध्येच जाण्यामुळंही ही समस्या येऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्या युजरच्या खात्यातून पैसे कमी झाल्यास ते पुन्हा त्यांच्या खात्यावर येतात. यासाठी तुम्हाला फार काहीच करावं लागत नाही. 2-3 कार्यालयीन दिवसांमध्ये तुमचे पैसे सुखरुरप तुमच्या खात्यावर परत येतात. त्यामुळं चिंता नसावी.