मुंबई : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि  IRCTC ने तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते घर प्रवास कायम थकवणारा आणि त्रासदायक असतो. मात्र, आता आयआरसीटीसीने प्रवाशांना घरापासून स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅब सेवा सुरू केली आहे. यासाठी आयआरसीटीसीने कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ओलासोबत करार केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीट बुक करण्याबरोबरच ही सुविधा देखील देण्यात येणार आहे. 


आयआरसीटीसीद्वारे अशी बुक होणार कॅब 


आयआरसीटीसीने ओलासोबत 6 महिन्यांसाठी सुरूवातीला हा करार केला आहे. आथा प्रवाशी रेल्वे अॅप किंवा वेबसाइटवरून ही कॅब बुक करू शकता. 


7 दिवस अगोदर करावी लागणार बुक 


रेल्वे यात्री स्टेशनवर पोहोचल्यावर किंवा प्रवाशाच्या 7 दिवस अगोदरच अॅडवान्स बुकिंग करू शकतात. आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटच्या ऐवजी प्रवाशी ओला अॅप किंवा आयआरसीटीसी आऊटलेटद्वारे कॅब बुक करू शकता.