IRCTC Ladakh Tour Package: चंद्र, चांदणे, ग्रह- तारे.... याविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं. पण, याच चंद्र- चांदण्या शहरी जीवनामध्ये कुठे दिसेनाशा झाल्या आहेत. प्रदूषण आणि तत्सम अनेक कारणांनी हल्ली शहरी भागांमध्ये एखादी चांदणी स्पष्टपणे दिसणं म्हणजे पर्वणीच. तुम्हीही विस्तीर्ण आकाशामधील चंद्र- ताऱ्यांमध्ये रमता? भारतीय रेल्वेच्या अख्त्यारित येणाऱ्या IRCTC कडून ही कमाल संधी अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथं तुम्हाला चक्क ताऱ्यांच्या गावाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआरसीटीसीच्या लडाख पॅकेजमध्ये तुम्हाला नुब्रा व्हॅली, शाम व्हॅली, पँगाँग त्सो यांसारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्रीच्या वेळी नुब्रा आणि शाम व्हॅलीचं सौंदर्य आणि येथील शांतता पाहता, रात्रीच्या अंधारामध्ये चांदण्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाकडे पाहताना आपण जणू ताऱ्यांच्याच गावात पोहोचलो आहोत, याची अनुभूती होते. 6 रात्री आणि 7 दिवसांसाठीच्या या सहलीची सुरुवात 14 ऑगस्टला होणार असून, ही सहल गुजरातच्या अहमदाबादहून सुरू होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातूनही तुम्ही जाऊ इच्छिता तर, अहमदाबाद गाठणं कठिण नाही. 


पॅकेजसंदर्भातली सविस्तर माहिती... 


IRCTC च्या वतीनं या पॅकेजमध्ये तुमच्या येण्याजाण्याच्या खर्चासह दोन वेळचं जेवण, चहा- नाश्ता आणि रात्रीच्या वेळी मुक्कामाची सोय केली जाणार आहे. या सहलीसाठी माणसी खर्च 42300 रुपये इतका असून, All Inclusive असं हे पॅकेज असणार आहे. आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये रुम शेअररिंग तत्त्वावरही माणसी दरामध्ये बदल असू शकतात. शिवाय इथं सहलीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लहान मुलांसाठीसुद्धा दरांमध्ये बदल अपेक्षित आहेत.


हेसुद्धा वाचा : 'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलत का?


 


दूरध्वनीवरूनही हे पॅकेज बुक करता येणार आहे. यासाठी तुम्ही 9321901849 आणि 9321901851 अशा दोन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला इथं संपर्क साधता येणार आहे. त्यामुळं ही संधी हातची जाऊन देऊ नका. 


लडाखला भटकंतीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांनी संपूर्ण तयारीनिशी आणि प्रकृती स्वास्थ्याला केंद्रस्थानी ठेवतच जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.