LIC Scheme :  तुम्हाला जर एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवता आले नाहीत आणि तुम्ही आजही पैसे गुंतवण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाच्यासाठी ही संधी चालुन आली आहे. कारण एलआयसीचा स्टॉक 24 टक्के डिस्काउंडवर सध्या ट्रेंड करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 मे 2022 ला एलआयसीचा आयपीओ 8 टक्के खाली अर्थात 872 वर लिस्ट झाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये विक्री सुरु आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण होते आहे. ज्यामुळे मोठ मोठ्या कंपन्याचे शेअर चांगल्या भावात उपलब्ध झाले आहेत. 


सध्या तज्ज्ञांनुसार एलआयसीचा शेअर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत शेअर 31 टक्के घसरला आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये रिकव्हरी येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


का येईल एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी?


ब्रोकरेज हाऊस जी पी मॉरगनने शेअरवर ओवररेडींगचा सल्ला दिला आहे. शेअरचा जो टारगेट आहे तो वाढवला असून 840 रुपयांपर्यंत शेअर वाढेल असं सांगण्यात आलं आहे. जे.पी. मॉरगननुसार एलआयसी भारतातील सर्वात मोठी जीवन बीमा कंपनी आहे. एलआयसीच्या नव्या बिजनेसची किंमत खुप जास्त आहे त्यानुसार शेअरची किंमत कमी आहे. सोबतच येणाऱ्या काळात सरकार एलआयसीतून हिस्सा काढू शकते.