मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली आहे. ईशाचं लग्न व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलशी होणार आहे. ईशा आणि आनंद यांचं लग्न मुंबईतच होणार आहे. यावर्षी १२ डिसेंबरला हे दोघं विवाहबंधनात अडकतील. अंबानी आणि पिरामल परिवार मागच्या ४ दशकांपासून एकमेकांना ओळखतात. मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार आनंदनं ईशाला महाबळेश्वरच्या मंदिरात प्रपोज केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा आणि आनंद यांचा साखरपुडा २१ सप्टेंबरला इटलीमध्ये झाला होता. ३ दिवस हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, सोनम कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटीज गेले होते. साखरपुड्यानंतर मुकेश अंबानींनी मुंबईमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ईशा आणि आनंदचं लग्न उदयपूर किंवा उत्तरांचलमध्ये होईल, असं बोललं जात होतं.


ईशा आणि आनंदच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आनंदचे आई वडिल, ईशा, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी उपस्थित होते.



सोमवारी अंबानी परिवार लग्नाची पत्रिका घेऊन सिद्धीविनायक मंदिरात गेले होते.



ईशा अंबानीच्या लग्नामध्ये गायक बियोंसे परफॉर्म करणार आहे. ईशा अंबानी बियोंसेची फॅन आहे. त्यामुळे मुकेश अंबानींनी बियोंसेला लग्नासाठी बोलावलं आहे.


आशियातल्या सगळ्यात पॉवरफूल १२ बिजनेस वूमनमध्ये ईशा अंबानीचा समावेश होतो. २०१५ मध्ये ईशा अंबानीचं नाव फोर्ब्स मासिकात सगळ्यात लहान वयातली दुसरी अरबपती म्हणून आलं होतं. २०१८ साली फोर्ब्सनं उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत ईशा दुसऱ्या क्रमांकावर होती. ईशा अंबानीची प्रत्येक वर्षाची कमाई ४७१० कोटी रुपये आहे.