मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. ईशा आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाचा सोहळा राजस्थानमध्ये सुरु होईल तर लग्न मुंबईत होईल. तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानच्या उदयपूरमध्ये प्री-वेडिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी दोन्ही कुटुंबांनी हॉटेलची बुकिंग करायला सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद पिरामल, पिरामल ग्रुपचे संस्थापक सेठ पिरामल यांचा पणतू आणि अजय पिरामल यांचा मुलगा आहे. आनंद पिरामल राजस्थानच्या झुंझुनूच्या बगडचे रहिवासी आहेत. भारताच्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची मुलगी या भागाची सून होणार आहे. बगड हा छोटा भाग असला तरी या गावातल्या हवेली जगात प्रसिद्ध आहेत.



अंबानी आणि पिरामल कुटुंबाची मैत्री गेल्या चार दशकांपासून आहे. 67 हजार कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय असलेल्या पिरामल बिजनेस एम्पायरची सुरुवात 1920 मध्ये झाली होती. पहिल्या महायुद्धाच्यावेळी दादासेठ पिरामल चतुर्भुज मखरिया 50 रुपये घेऊन मुंबईत आले होते.


बगडमध्ये आजही पिरामल ग्रुपची हवेली आहे. या भागातल्या हवेली बऱ्याच प्रसिद्ध आहे. पिरामल यांच्या हवेलीतील वास्तू कला भव्य आहे. आता या हवेलीचा हॉटेल म्हणून वापर होत आहे. या हॉटेलमध्ये प्रवासी येऊन राहतात. ही हवेली आजही पिरामल ग्रुपकडे आहे.



राजस्थानमध्ये बड्या श्रीमंत व्यक्ती आणि सावकरांनी राहण्यासाठी मोठमोठ्या हवेली बांधून ठेवल्या होत्या. बहुमजली असलेल्या या हवेली वास्तू कलेच्या दृष्टीनं भिन्न आणि कलात्मक होत्या. झुंझुनूमध्ये असलेल्या या हवेली आजही वास्तू कलेचं उत्कृष्ट उदाहरण आहेत.