संजय लोहानी, सतना : मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात पुन्हा एकदा टेरर फंडिंगचं प्रकरण समोर येतंय. देशात दहशतवाद पसरवण्यासाठी पैसे गोळा करणाऱ्या एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांच्या चौकशीनंतर तीन जणांना अटक करण्यात आलीय. याशिवाय दोन संशयितांची चौकशी अद्याप सुरू आहे. एटीएसनं सतनामधून सुनील सिंह, बलराम सिंह आणि शुभम मिश्रा यांना अटक करून आपल्यासोबत भोपाळला नेलंय. तर भारवेंद्र सिंह आणि प्रदीप कुशवाहा यांची चौकशी अद्याप सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींपैंकी बलराम सिंह याला २०१७ सालीही टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आरोपींकडून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि १७ पाकिस्तानी क्रमांक मिळालेत. या टोळीतल्या आणखी जणांच्या शोधार्थ एटीएसची एक टीम छतरपूर आणि अलाहाबादलाही धाडण्यात आलीय.



उल्लेखनीय म्हणजे, हे सर्व आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते. रीवा रेंजचे आयजी चंचल शेखर यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.