नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील भिंतीवर आयसीसच्या समर्थनार्थ फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आयसीससोबत नक्षलवादाला पाठिंबा देणारे संदेश भिंतीवर लिहिण्यात आलेत. या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिका-यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या इमारतीजवळील भिंतीवर हा मजकूर लिहीण्यात आलाय.. 'मी आयीसचा समर्थक', 'नक्षलवाद्यांना न्याय द्या' अशा आशयाचा हा मजकूर आहे. शनिवारी हा धक्कादायक प्रकार घडलाय.