इस्त्रो अंतरळात रचणार नवा इतिहास, याबद्दल तुम्हाला माहितेय का ?
स्कायरुट इस्त्रोच्या मदतीने डिसेंबर २०२१ पर्यंत अंतराळात रॉकेट लॉन्च करणार
नवी दिल्ली : भारत अंतराळ क्षेत्रात महाशक्ती बनलाय. इस्त्रो (ISRO) वैज्ञानिकांनी अनेक टप्प्यांवर यश मिळवले असून हे निरंतर सुरुच आहे. 'मेक इन इंडीया' आणि 'मेक फॉर वर्ल्ड' हा मंत्र घेऊन भारतीय कंपनी स्पेस सेक्टरमध्ये नवे पाऊल टाकण्यासाठी चालली आहे. भारताची एयरोस्पेस कंपनी स्कायरुट इस्त्रोच्या मदतीने डिसेंबर २०२१ पर्यंत अंतराळात रॉकेट लॉन्च करणार आहे.
स्कायरुटने आपले पहिले लॉन्च वेहिकिलचे नाव 'विक्रम १' (Vikram 1) ठेवलय.स्कायरुट एअरोस्पेस पहिले भारतीय स्टार्टअप आहे ज्याच्या माध्यमातून पहिल्या खासगी रॉकेट इंजिन 'रमण' चे यशस्वी परीक्षण झाले.
भविष्यात रॉकेट इंजिनच्या क्षेत्रात हे महत्वाचे पाऊल मानले जातंय. रॉकेट इंजिनचे मुख्य रुपात प्रकार असतात. हे अनेक टप्प्यात काम करतं. प्रत्येक पातळीसाठी वेगळ इंजिन जोडलेलं असतं. ज्याच्या काही इंजिनमध्ये तरल इंधन वापरल जात. हे रॉकेट उभ्या सिलेंडरच्या आकारात असते, जे आपल्या इंजिनच्या मदतीने वेगाने पुढे जाते.
कंपनीने यापूर्वीच रॉकेटच्या अप्पर स्टेज इंजिनची चाचणी केली आहे. ज्याचे सुरुवातीचे काम काम पूर्ण झाले. जर सर्व काही सुरळीत राहिले तर डिसेंबर 2021 पर्यंत ते इस्रोच्या मार्गदर्शनाखाली रॉकेटचे मैदानी प्रक्षेपण होईल असे स्कायरूटच्या टीमने झी मीडियाला सांगितले.
खासगी क्षेत्रात भारतात प्रथमच लिक्विड इंजिनचा वापर करुन यशस्वी चाचणी केली. कंपनीच्या दोन रॉकेट स्टेज सहा महिन्यांत चाचणीसाठी तयार असतील असेही स्कायरुटच्या टीमने सांगितले.
सध्या 3 रॉकेटवर काम करत असून इस्रोच्या संस्थापकांची आठवण ठेवून त्याचे नाव विक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय असे नाव देण्यात आलंय. विक्रम हे चार-टप्प्यांचे रॉकेट असून अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. चाचणी दरम्यान इंजिनमध्ये लिक्विड इंधन वापरण्यात आले.
रमन या इंजिनचे नाव ठेवून कंपनीने त्याद्वारे नोबेल पुरस्कार विजेते सर सीव्ही रमण यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केलाय. रमण इंजिनमध्ये यूडीएमएच आणि एनटीओ लिक्विड इंधन वापरतात. ४ इंजिनचे हे क्लस्टर 3.4 केएन थ्रस्ट निर्माण करतं. हे इंजिन एकाच वेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित करू शकेल अशी माहितीही स्कायरुटतर्फे देण्यात आली.