मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओचं खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ आहे चंद्रयान 2 ची कमान सांभाळणारे इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांचा. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रत्येकजण त्यांच्यातील साधेपणाचं कौतुक मनापासून करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्याबद्दल त्यांच मनापासून कौतुक होत आहे. या व्हिडिओत त्यांना विमानातील केबिन क्रू ते प्रवाशांनी खूप कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. विमानात प्रवेश करताच प्रवाशी आणि एअरलाइन्सच्या स्टाफने त्यांना उभं राहून मानवंदना दिली. तर काहींनी हा सुंदर क्षण सेल्फीमधून कैद केला. 



हा व्हिडिओ सिवन यांच्यासोबतच प्रवास करणाऱ्या प्रवाशाने शूट केला आहे. शूट करून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ अगदी काही क्षणातच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ खाली खूप कमेंट आले आहेत. काहींनी के सिवन यांना रिअल हिरो असं म्हटलं आहे. 



तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधील एका सामान्य कुटुंबात सिवन यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल शेतकरी आहेत. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कठीण प्रसंगांना तोंड देत ते पुढे जात गेले.