भारताची चांद्रयान 3 मोहीम पूर्ण झाली असून, यशस्वी ठरली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. सध्या दोघेही डिअॅक्टिव्ह म्हणजेच झोपेत आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे. जर दोघांना जाग आली तर उत्तम, अन्यथा कोणतंही नुकसान होणार नाही आहे. आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही असं इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे. ते गुजरातमध्ये बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे की, प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला जे काम देण्यात आलं हे, ते आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे जर आता ते झोपेतून जागे झाले नाहीत तरी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली आहे. जर रोव्हर आणि लँडरचे सर्किट डॅमेज झाले नसतील तर प्रज्ञान आणि विक्रमला पुन्हा जागं करण्यात आलं असतं. कारण शिवशक्ती पॉईंटवर तापमान उणे 200 डिग्री सेल्सिअसच्या खाली पोहोचलं आहे. तसं तर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत चांद्रयान 3 चंद्रावर उपस्थित राहणार आहे. 


इस्रोच्या प्रमुखांनी आता प्रज्ञान आणि विक्रम जागे झाले नाहीत तर काही अडचण नाही असं म्हटलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केली आहे. दोघांना पुन्हा जागं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. पण सध्या तेथून कोणताही संदेश येत नाही आहे. याचा अर्थ त्याच्यात आता सिग्नल मिळण्याची क्षमता कमी झाली आहे. यानंतर आता इस्रो आपल्या पुढील मोहिमेबद्दल सांगणार आहे. 


नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जाणार XPoSat, INSAT-3DS


एक्सपोसैट (XPoSAT) म्हणजेच एक्स-रे पोलैरीमीटरचं (X-ray Polarimeter Satellite) लाँचिंग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे. हे देशाचं पहिलं पोलैरीमीटर सॅटेलाईट आहे. हे सॅटेलाईट अंतराळातील एक्स-रे स्त्रोतांचा अभ्यास करणार आहे. हे सॅटेलाईट लाँचसाठी तयार असून लवकरच तारखांची घोषणा केली जाणार आहे. पीएसएलव्हीच्या सहाय्याने हे लाँचिंग होणार आहे. ब्लॅक होल्स, नेबुला आणि पल्सर यांचा अभ्यास यातून केला जाणार आहे.  


याशिवाय हवामाना निरीक्षणासाठी सॅटेलाइट लाँच केला जाणार आहे. ज्याचं नाव INSAT-3DS आहे. हा सॅटेलाईट देशातील हवामानासंबंधित माहिती देईल. यानंतर SSLV-D3 रॉकेट लाँच होणार आहे. हे लाँचिगसुद्धा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे. 


फेब्रुवारीत NISAR चं लाँचिंग


यानंतर भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहिम लाँच होणार आहे. याचं नाव निसार आहे. याचा अर्थ इंडिया-युएस बिल्ट सिंथेटिक अपर्चर रडार. निसारच्या सहाय्याने जगावर येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटाचा आधीच अंदाज लावू शकतो. निसारला पृथ्वीच्या खालच्या भागात स्थापन केलं जाणार आहे.