इस्रो आज लाँच करणार जीसॅट-7ए उपग्रह
श्रीहरिकोटात काऊंटडाऊन सुरू
मुंबई : इस्त्रोने मंगळवारी आपल्या संचार उपग्रह जीसॅट-7 ला लाँच करणार असल्याच काऊंटडाऊन सुरू केला आहे. श्रीहरिकोटात असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी याच काऊंटडाऊन सुरू झालं.
बुधवारी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी जीएसएलवी-एफ 11 रॉकेटला घेऊन लाँच केलं जाणार आहे. इस्त्रोद्वारे निर्मित जीसॅट-7ए चे वजन 2,250 किलोग्रॅम आहे.
हे मिशन आता आठ वर्षांच झालं आहे. इस्त्रोने मंगळवारी सांगितलं की, मिशन रेडिनेस रिव्ह्यू कमेटी आणि लाँच ऑथरायझेशन बोर्डने काऊंटडाऊन सुरू केलं आहे.
जीएसएलवी-एफ 11 ची हे 13 वे प्रक्षेपण आहे. सातव्यांदा हे स्वदेशी क्रायोनिक इंजिनसोबत लाँच होणार आहे. याद्वारे कू-बँडच्या संचारला उपलब्ध करून देणार आहे.
इस्त्रोचं हे 39 वं संचार उपग्रह असून याला खासकरून भारतीय वायुसेनेला उत्तम संचार सेवा देण्याच्या उद्देशाने लाँच केलं आहे.
इस्त्रोने सांगितलं की, श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये जीएसएलवी-एफ 11 च्या माध्यमातून हे उपग्रह प्रक्षेपित झालं आहे. 26 तासांचा उलटा प्रवास मंगळवारी सुरू झाला आहे.
जीएसएलवी एफ 11 जीसॅट 7 ए ला जियोसिंक्रोनस ट्रान्सफर आर्बिट (जीटीओ) मध्ये सोडणार आहे. जीएसएलवी -एफ 11 इस्त्रोची चौथी पीढीचं प्रक्षेपण करणार आहे.
या प्रक्षेपणाला जवळपास 500-800 करोड रुपये लागले आहेत. वायुसेनाला पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी एक उपग्रह जीसॅट -7 सी मिळण्याची आशा आहे. ज्यामुळे नेटवर्कद्वारे त्याच्या ऑपरेशन्सच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.
जीसॅट - 7 ए च्या अगोदर इस्त्रोने 29 सप्टेंबर 2013 मध्ये जीसॅट - 7 ला देखील लाँच केलं. जे 'रूक्मिणी' नावाने ओळखले जाते. हे उपग्रह भारतीय नौसेने करता होते.