इस्रो १०० व्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यास सज्ज झालीये.
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यास सज्ज झालीये.
आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावेल.
हवामान निरीक्षण
हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे.
या उपग्रहासह देश-विदेशातले अन्य ३० उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात येणार आहेत.
काऊंटडाऊन सुरू
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावर पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी या प्रक्षेपणाचं २८ तासांचं काऊंटडाऊन सुरू झालंय.
कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात येणार आहे.
या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.