ISRO मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, 1 लाख 40 हजारपर्यंत पगार; `येथे` पाठवा अर्ज
ISRO Recruitment: इस्रोमध्ये टेक्निशियन सहायक, टेक्निशियन बी सहित इतर पदे भरली जातील.
ISRO Recruitment: दहावी उत्तीर्ण इतकं कमी शिक्षण असल्याने मला नोकरी मिळणार नाही, असे अनेकांना वाटते. पण आता काही काळजी करण्याची गरज नाही.भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये बंपर भरती निघाली आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 19 हजार ते 1 लाख 42 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इस्रोमध्ये टेक्निशियन सहायक, टेक्निशियन बी सहित इतर पदे भरली जातील. यात मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, ट्यूनर, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, मशिनिस्ट, जड वाहन चालक 'ए', हलके वाहन चालक 'ए', कूक या पदांचा समावेश आहे.
मॅकेनिकल
मॅकेनिकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये इतका पगार मिळेल.
वेल्डर
वेल्डर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एमएमएलसी/एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच एसीव्हीटीतून वेल्डर ट्रेडमध्ये आयटीआय, एनटीसी किंवा एनएसी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये इतका पगार मिळेल.
जड वाहन चालक
जड वाहन चालक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे वाहन चालकाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. त्यात जड वाहन चालकाचा 3 वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये इतका पगार मिळेल. यासोबतच उमेदवाराकडे स्वत:चा परवाना असावा.
हलके वाहन चालक
हलके वाहन चालक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे हलके वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये इतका पगार मिळेल. यासोबतच उमेदवाराकडे स्वत:चा परवाना असावा.
कूक
कूक पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. सोबतच त्याच्याकडे हॉटेल, कॅन्टीमध्ये कूक म्हणून कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये इतका पगार मिळेल.
कसा कराल अर्ज?
लेखी परीक्षा, स्किल टेस्टच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इस्रोची अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जा. करंट अपॉर्च्युनिटी पर्यायावर क्लिक करा. अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. मागितलेली सर्व माहिती भरा.संबंधित डॉक्यूमेंट्स अपलोड करा. अर्ज भरल्यावर त्याची प्रिंटआऊट घ्या.