Viral News : चोरी (thief) पकडली गेल्यानंतर ती करणारा चोर हा नेहमीच काही ना काही कारण सांगून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत असतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये चोर चोरीनंतर गरिबांमध्ये त्या वाटून टाकतो. छत्तीगडमध्येही एका चोराला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेही असेच काहीसे सांगितले. पण त्याने दिलेल्या उत्तराने तिथे उपस्थित असलेल्यांना हसू अनावर झालं (Thief Funny Confession). याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका चोराने दिलेल्या उत्तराने सगळ्यांनाच हसू फुटलं. या दानशूर चोराची गोष्ट ऐकून पोलिसही चकित झाले आणि त्यांनाही हसू आवरता आले नाही. पोलीस अधीक्षकांच्या प्रश्नांचा आणि चोरांच्या उत्तरांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चोरट्याच्या म्हणण्यानुसार त्याने चोरीच्या पैशातून गरिबांना ब्लँकेटचे वाटप केले आहे. दुर्गचे पोलिस अधीक्षक (SP) डॉ. अभिषेक पल्लव यांनी चोराची चौकशी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 


चोरी करायला बरे वाटले पण नंतर पश्चाताप झाला


छत्तीसगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून चोरट्यांची टोळी पकडली होती. चौकशीत एका चोरट्याने अडीच लाखांच्या चोरीत दहा हजार रुपये मिळाल्याचे सांगितले. आधी चोरी करायला बरे वाटले पण नंतर पश्चाताप झाला. तसेच चोरीची रक्कम रस्त्याच्या कडेला बसलेल्या गाई, कुत्रे आणि गरिबांना ब्लँकेट आणि खायला देण्यात खर्च केली असे त्या चोराने म्हटले. चोराचे हे उत्तर ऐकून पोलीस अधिकारी हसले.


पाहा व्हिडीओ -



हा व्हिडिओ जिंदगी गुलजार है नावाच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आला असून आतापर्यंत त्याला 40 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने, 'बिचारा बेरोजगार होता पण गरीबांना मदत करण्याची इच्छा होती,' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, श्रीमंतांकडून चोरी करुन गरिबांना पैसे देणे ही चोरी नाही, असेही म्हटले आहे.