ITBP Recruitment Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दहावी उत्तीर्ण तरुणांना आता चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसोबत देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात भटकत असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आटीबीपीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. 


आयटीबीपीमध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ITBP कॉन्स्टेबल भरती 2023 मोहिमेंतर्गत, एकूण 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)  ग्रुप सी नॉन-राजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी संस्थेमध्ये (ITBP भर्ती) भरती केली जाणार आहे.


या पदभरतीच्या अखेरीस निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्समधील स्तर-3 अंतर्गत 21700 ते 69100 रुपये पगार दिला जाार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार दिला जाणार आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच ही भरती ड्रायव्हर पदासाठी असल्याने संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाच नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. 


ITBP भरतीसाठी 27 जून 2023 पासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 जुलै 2023 पर्यंत अर्ज करु शकतात. 


ITBP साठी शैक्षणिक पात्रता 


उमेदवारांनी मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.


उमेदवारांना आपले अर्ज अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in वर जाऊन भरता येणार आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. तसेच अवैध शैक्षणिक कागदपत्रे दिली असल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.


उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा