मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात एका महाविद्यालयामध्ये चक्क भाजपाला मत देऊ नये, अशी शपथ देण्यात आलीये. इटारसीमधल्या ITI विजयलक्ष्मीमध्ये हा प्रकार घडलाय. 


तोपर्यंत मत देणार नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत ऑनलाईन परीक्षा रद्द होत नाहीत, तोपर्यंत भाजपाला मत देणार नाही, अन्य विद्यार्थ्यांना असं करण्यास प्रवृत्त करेन आणि भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणार नाही, अशा आशयाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आलीये. 


भाजपला बसणार फटका


या वर्षअखेर मध्यप्रदेशात विधानसभेसाठी मतदान होईल. सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.