मुंबई : भारतीय पोस्ट आता आपल्या जवळच्या पोस्टमध्ये सर्व्हिस सेंटरच्या (post office as common services centres) काऊंटरवर ITR भरण्याचे ऑप्शन देत आहे. देशभरातील लाखो टॅक्सपेअर्ससाठी ही चांगली बातमी आहे. भारतीय पोस्टच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून टॅक्सपेअर्स पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवर ITR दाखल करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्ट ऑफिसचे सीएससी काऊंटर भारतीय नागरिकांसाठी डाक, बँकिंग आणि विमा सारख्या अनेक वित्तीय सेवा उपलब्ध असतात. नागरिकांना सीएससीच्या काऊंटरच्या माध्यमातून अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो.



पोस्ट ऑफिसच्या सीएससी केंद्रांच्या माध्यमांतून भारतीय नागरिकांना अन्य ई-सेवा उपलब्ध होतात. डिजिटल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा येथे लाभ घेता येतो. सीएससी केंद्रांमध्ये ITR फाइल करण्याच्या सेवेचाही आता यात सामावेश झाला आहे.