नवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. प्राप्तिकर विभाग लोकांना सतत आयटीआर भरण्याचे आवाहन करत होता. पण शेवटची तारीख उलटूनही तुम्ही आयटीआर दाखल करू शकला नाही, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमच्याकडे अजूनही ITR फाइल करण्याचा पर्याय आहे. अंतिम मुदत संपल्यानंतरही कोणत्याही आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करू शकाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटची तारीख निघून गेल्यावर तुम्ही ITR दाखल करू शकता. अंतिम मुदत संपल्यानंतर आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागेल. आर्थिक वर्ष 2020-21 साठी उशीरा ITR दाखल करण्‍याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.


नियम काय आहेत?


प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, निर्धारित कालावधीत ITR न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत यासाठी विलंब शुल्क भरावे लागेल. हे विलंब शुल्क 5,000 रुपयांपर्यंत असू शकते. जर तुम्ही निर्धारित वेळेत ITR दाखल केला नसेल तर तुम्ही 5,000 रुपयांच्या दंडासह 31 मार्च 2022 पर्यंत उशीरा ITR दाखल करू शकता.


दंड किती भरावा लागेल?


हा दंड प्राप्तिकर विभाग उत्पन्नाच्या आधारे ठरवतो. उदाहरणार्थ, तुमचे उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला फक्त 1,000 दंड भरावा लागेल. त्याच वेळी, ज्यांचे उत्पन्न 2.50 लाख किंवा त्याहून कमी आहे, त्यांना उशीरा ITR भरण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा दंड भरावा लागणार नाही.


प्राप्तिकर विभागाने दिली ही माहिती 


प्राप्तिकर विभागाने सांगितले की, 31 डिसेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत नवीन ई-फायलिंग पोर्टलवर सुमारे 5.89 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत.


विशेष बाब म्हणजे यापैकी शेवटच्या तारखेला किंवा 31 डिसेंबरला 46.11 लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते. म्हणजेच, बहुतेक लोकांनी शेवटच्या तारखेलाच आयटीर भरला होता.