जागतिक उद्योजक परिषदेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन
जागतिक उद्योजक परिषद २०१७ चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये उद्घाटन होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
हैदराबाद : जागतिक उद्योजक परिषद २०१७ चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये उद्घाटन होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इव्हांका ट्रम्प याही यानिमित्तानं भारत दौऱ्यावर आल्या आहेत. भारत आणि अमेरिकेतले प्रत्येकी ४०० उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विेशेष म्हणजे या परिषेदत उपस्थित प्रतिनिधींपैकी तब्बल ५२ टक्के प्रतिनिधी महिला आहेत. रात्री उशिरा इव्हांका ट्रम्प यांचं भारतात आगमन झालं. यावेळी भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सारणा त्यांच्या स्वागताला हैदराबाद विमानतळावर उपस्थित होते.
इंवाका ट्रम्पकडे सर्वांचे लक्ष
द हिंदूच्या रिपोर्टनुसार, इवांकाची सुरक्षा तीन लेव्हलची असेल. सर्वात आतल्या बाजून यूनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस(USSS)चे जवान तैनात असतील. तर इतर दोन लेव्हलमध्ये हैदराबाद पोलीस यांची सुरक्षा असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इवांकाला कुणीही भेटू शकणार नाहीये. तिला भेटणा-यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यादीत जे नाव असेल त्यांच्याशिवाय कुणालाही तिथे एन्ट्री मिळणार नाहीये. सध्या इवांका हैदराबादच्या कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार हे गुप्त ठेवण्यात आलं आहे. एका सिनिअर ऑफिसरनुसार, इवांकाला थांबण्यासाठी काही फाईव्ह स्टार हॉटेल्सची बुकिंग करण्यात आली आहे. इवांका ज्याही मजल्यावर थांबणार त्या मजल्यावर वर आणि खाली कुणालाही थांबण्याची परवानगी नाही. इथे जवान तैनात करण्यात येतील.