Jain Monk Video : तुम्ही Yeh Jawani Hai Diwani चित्रपट पाहिलाय का? त्यात अभिनेता (Ranbir Kapoor) रणबीर कपूर यानं साकारलेली Bunny ची भूमिका सर्वांनाच आवडली. त्यानं प्रेक्षकांना हसवलं, रडवलं, प्रेमातही पाडलं. असाच एक तरुण प्रत्यक्ष आयुष्यात सर्वांच्या नजरा वळवत आहे. एकाएकी त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे त्या मुलानं ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय. जिथं '22 तक पढ़ाई, 25 पे नौकरी, 26 पे शादी, 30 पे बच्चे, 60 पे रिटायरमेंट और फिर मौत का इंतजार' असं म्हणणारे अनेकजण आहेत. पण, हा तरुण मात्र याला अपवाद ठरला. कारण त्यानं ऐन तारुण्यात सर्व हव्यास सोडत संन्यस्त मार्गाची निवड केली. (jain Model to monk praveen Kankaria went viral on social media )


मॉडेल टू माँक (model to monk )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण करनकरिया (praveen Kankaria) असं या तरुणाचं नाव असून, काही महिन्यांपूर्वी त्यानं जैन धर्माची दीक्षा घेतली आणि सर्वांच्याच डोळ्यांत त्याचा हा त्याग पाहून अश्रू उभे राहिले. जीवनात सर्वकाही सुरळीत सुरु असताना प्रवीणनं घेतलेला हा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही. पण, अध्यात्माच्या मार्गावर त्यानं गाठेलला हा टप्पा सर्वांनाच थक्क करुन गेला. 


हा माझा अखेरचा जन्म 


संन्यास घेण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या समारंभादरम्यान त्यानं आई- वडील आणि बहिणीचे आभार मानले. या क्षणांविषयी म्हणताना त्यानं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 'जीवन म्हणजे जन्म- मृत्यूचं चक्र. मी आशा करतो की हा माझा अखेरचा जन्म असेल. म्हणूनच माझे आधारस्तंभ असणाऱ्या माझ्या आई- वडिलांप्रती आणि बहिणीप्रती कृतज्ञता व्यक्त करतोय', असं त्यानं म्हटलं. कुटुंबीयांना त्यानं दिलेला हा निरोप पाहताना अनेकांचेच डोळे पाणावले. (praveen Kankaria instagram)


वाचा : New Year 2023 Horoscope : नव्या वर्षात तुम्हीच ठरणार नशीबवान; पाहा कोणत्या 3 राशींना बाराही महिने फळणार 


जैन धर्मात दीक्षा घेणं म्हणजे नेमकं काय? (Jain Diksha)


जैन धर्मामध्ये दीक्षा घेणं ही संकल्पना भौतिक सुखांचा त्याग करण्याशी संबंधित आहे. जिथं कुणीही सर्वसामान्य व्यक्ती त्यांचं आयुष्य संन्यस्त मार्गानं व्यतीत करण्याचा निर्णय घेते. जैन धर्मात यालाच 'चरित्र' किंवा 'महानिभिश्रमण' असंही म्हटलं जातं. एका दिमाखदार सोहळ्यामध्ये या व्यक्ती मुनीजन होऊन पुढच्या मार्गावर प्रस्थान करतात. 





दीक्षा घेतल्या क्षणापासून 'या' पाच वचनांच्या पालनासाठी हे मुनी समर्पित असतात 


सत्य- कायम खरं बोलत सत्याच्याच मार्गावर जाणं
अहिंसा- कोणत्याही जीवाला आपल्या तन-मन किंवा वचनातून इजा न पोहोचवणं 
अस्तेय- इतरांचं सामान, प्रलोभनीय वस्तूंपासून दूर राहणं 
ब्रह्मचर्य- आपल्या सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवणं आणि कुणाशीही शरीरिक संबंध न ठेवणं 
अपरिग्रह - गरज आहे तितकंच स्वत:कडे ठेवा. आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टी साठवू नका.