नवी दिल्ली : पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच याची प्रचिती पुन्हा आली आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले. याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. पाकिस्तान स्वत:च्या भूमीत थारा देऊन अशा दहशतवादी संघटनांना खतपाणी घालत असते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश ए मोहम्मदच पुलवामाचा पिच्छा पुरवण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमधील जैशच्या ठिकाणावर भारताने हल्ले चढवले. यामध्ये जैशचे 300 हून अधिक जण मारले गेल्याचा दावा भारताने केला आहे. या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी नागरीकाला इजा पोहोचणार नाही याची काळजी भारतीय जवानांनी घेतली होती. तरीही पाकिस्तानला आपण कमी नाही आहोत हे सिद्ध करायचे होते म्हणून भारतीय हद्दीत त्यांनी 3 विमाने घुसवली. भारताविरुद्ध न वापरण्याच्या अटीवर अमेरिकेने दिलेले एफ 16 विमान पाकने भारतीय हद्दीत घुसवले. आता पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातून सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट जैश ए मोहम्मदची पाठराखण सुरू केली आहे.. पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याची जैश ए मोहम्मदने जबाबदारी घेतलीच नाहीये असं विधान शाह मेहमूद कुरेशी सांगतायत. पाकिस्तानच्या नेतृत्वाने जैशच्या नेत्यांशी संपर्क साधून याबाबत विचारलं असता त्यांनी जबाबदारी घेतली नसल्याचं स्पष्ट केलं असा दावा शाह मेहमूद कुरेशी करत आहेत. 


विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या भारताच्या वापसीत उशीर झाल्याबद्दल विविध संशय उपस्थित केले जात आहेत. इथेही पाकिस्तानचा आडमुठेपणा समोर आला. अभिनंदन यांना सोडण्यास उशीर करुन दोन्ही देशातील माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला. भारताला कमीपण दाखवण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नसल्याचे  पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे स्वतः अभिनंदन यांच्या हस्तांतरणाआधी लाहोरमध्ये उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. खान स्वतः लाहोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दाखल झाले. अभिनंदन यांचं हस्तांतरण सुरळीत व्हावं यासाठी इम्रान खान उपस्थित होते असं सांगितलं जातंय. हे हस्तांतरण कितपत सुरळीत झालं हे सगळ्या जगाने टीव्हीवरून पाहिलंच आहे.