फाशी देताना जल्लादही होतो भावुक, आरोपीच्या कानात बोलते `हे` दोन शब्द
`चुकीला माफी नाही....` आरोपीला फाशी देताना जल्लादही होतो भावुक.... `ते` दोन शब्द म्हणतो, त्यानंतर...
मुंबई : काही असे गुन्हे आहेत, ज्यांना फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा आहे. आरोपींनी काही भयानक गुन्हा केला असेल, तर त्यांना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. पण एखाद्या गुन्हेगाराला फाशी देण्यापूर्वी अनेक गोष्टींची पडताळणी करण्यात येते. कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी, जल्लाद कैद्याच्या वजनाचा पुतळा तयार करून तपासणी करतो..
त्यानंतर योग्य तो दोरखंड फाशीसाठी मागवला जातो. गुन्हेगाराच्या नातेवाईकांना 15 दिवस अगोदर कळवले जाते की ते कैद्याला शेवटच्या वेळी भेटू शकतात. फाशी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया असतात त्या पूर्ण कराव्या लागतात.
गुन्हेगाराला फाशी देण्यापूर्वीचे नियम
- फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ करून नवीन कपडे दिले जातात.
- पहाटे कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक गुन्हेगाराला फाशीच्या खोलीत आणतात.
- फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात.
- हे तीन अधिकारी कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात.
- अधीक्षक फाशी देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्याला कळवतात की कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचे वॉरंट वाचून दाखवण्यात आले आहे.
- डेथ वॉरंटवर कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात.
- फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.
- ज्या जेल मॅन्युअलमध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण केल्या जातात.
- फाशी देताना फक्त जल्लादच दोषींसोबत असतो.
गुन्हेगाराला फाशी देणारा जल्लद देखील भावुक होते. त्यामुळे फाशी देण्याआधी जल्लाद आरोपीच्या कानात काही गोष्टी सांगतो. जल्लाद म्हणतो, 'मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मी कायद्याला बांधिल आहे...'
एवढंच नाही तर गुन्हेगार जर हिंदू असेल तर जल्लाद त्याच्या कानात राम-राम म्हणतो, तर दुसरीकडे गुन्हेगार मुस्लिम असल्यास त्याला शेवटचा सलाम करतो. असं म्हटल्यानंतर, जल्लाद लीव्हर ओढतो आणि दोषीचा जीव जाईपर्यंत लटकतो. यानंतर, डॉक्टर खातर जमा करून घेतात.