मुंबई : स्थानिक रहिवाशी आणि बाहेरून आलेल्या ट्रक ड्रायव्हरांवर निशाणा साधल्यानंतर आता दहशतवाद्यांनी काश्मिरला काळोखात ठेवण्याचा चंग बांधला आहे. काश्मिरला काळोखात ठकलण्यासाठी विजेच्या टॉवरला कापण्याची नवी शक्कल लढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मिरच्या शोपिया परिसरात दोन विजेचे टॉवर कापण्याचा प्रयत्न करून स्थानिक नागरिकांना त्रास देण्याची नवी रणनीती दहशतवाद्यांनी स्विकारली आहे. चितरगावात ब्लॅकआऊट करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. 



बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत. त्यांनी शोपिया परिसरात 440 मेगावॉट विजेच्या ट्रांसमिशन टॉवरच्या खालच्या भागातून कट-आउट कापला गेला. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर घाटीत संपूर्ण काळोख पसरेल. हा टॉवर पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा आहे. 


जम्मू काश्मिरचे पोलीस अधिकारी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, मिलिटेंट्स जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर हे काम करत आहेत. त्यामुळे दोघांना दुखापत होणार आहे. दोघांचं नुकसान व्हावं हा यामागचा उद्देश आहे. तसेच सामान्यांच्या पोटावर पाय यावा याकरता हा प्रयत्न केला जात आहे. सामान्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांच नुकसान करायचा हा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. 


तसेच जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये बस स्टॅंडवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात १५ हून अधिक नागरिक जखमी झाले. सुरक्षा जवानांनी बस स्टॅंड घेरले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षाकर्मींवर निशाणा साधत हे ग्रेनेड फेकले होते अशी माहिती समोर येत आहे. जखमी झालेल्यांमध्ये एक महिला देखील आहे.