जम्मू काश्मीर : दोन फळ विक्रेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
राजस्थानच्या ट्रक ड्रायव्हरनंतर पंजाबच्या दोन फळ विक्रेत्यांना निशाणा बनवले.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांनी छत्तीसगड येथील मजदूर आणि राजस्थानच्या ट्रक ड्रायव्हरनंतर पंजाबच्या दोन फळ विक्रेत्यांना निशाणा बनवले. बुधवारी शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी चरणजीत सिंह आणि संजू कुमार नावाच्या फळविक्रेत्यांना गोळी मारली. या हल्ल्यात चरणजीत सिंह याचा जागेवरच मृत्यू झाला. तर संजू कुमार गंभीर जखमी झाला. हे दोन व्यापारी गेल्या दहा दिवसांपासून काश्मीरमध्ये फळांच्या व्यापारासाठी आले होते.
या हल्ल्यात जखमी झालेला संजू कुमार हा काश्मीरच्या किन्नू व्यापाऱ्याचा भाचा आहे. किन्नू आणि माल्टा हे दोघे व्यापारी हंगामाच्यावेळी गेले पंधरा वर्ष काश्मीरात येतात. काश्मीरमध्ये संत्री विकल्यानंतर ते इथून सफरचंद घेऊन जायचे. सफरचंद विक्रेत्याची हत्या
श्रीनगरच्या शोपिया भागातील सिंधु शेरमल परिसरात दहशतवाद्यांनी राजस्थानच्या ट्रक ड्रायव्हरची गोळी मारून हत्या केली. ज्यानंतर दक्षिणी काश्मीर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी या घटनेबाबत निंदा व्यक्त केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रक ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी 15 लोकांना चौकशीकरता ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजता घडली आहे. जेव्हा सरफचंदांनी भरलेल्या ट्रकवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ड्रायव्हरची हत्या केल्यानंतर त्या ट्रकला आग लावण्यात आली.
फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार देशातील सर्व ठिकाणी सफरचंद पाठवणं ही आमची जबाबदारी आहे. कारण 5 ऑगस्टनंतर अनुच्छेद 370 काढून टाकण्याच्या अगोदरच काही लोकांकडून आधीच काही रक्कम घेतली होती. फळ विक्रेत्यांच म्हणणं आहे की, फळ उत्पादन करणं हे काही अनधिकृत आणि चुकीचं काम नाही आहे. ज्या करता आम्हाला टार्गेट केलं जातं आहे.
काश्मीर खोऱ्यात केंद्र सरकार निर्बंध शिथिल करत असल्यामुळे दिवसेंदिवस जनजीवन पूर्ववत होत आहे. यात व्यापारी, स्थानिक दुकानदार, पर्यटन व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांवी आता सफरचंद बाग मालकांना, विक्रेत्यांना, ने -आण करणाऱ्या ट्रक चालकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे.