श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या  (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची सुटका करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधून मोदी सरकारने अनुछेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मेहबुबा मुफ्ती यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यांना १४ महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवण्यात आले होते. जम्मू-काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ट्विट केले की, 'मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्यात आली आहे.'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरची पहिल्या महिला मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा यांना केंद्र सरकारने दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्यासाठी आणि अनुछेद ३७० रद्द करण्याच्यावेळी अनेक इतर नेत्यांसह त्यांना ताब्यात घेतले. मुफ्ती यांना कलम १०७ आणि १५१ अन्वये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर  सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहबुबाची मुलगी इल्तिजा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या अटकेला आव्हान दिले होते, यावर अखेर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते- फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना सात महिन्यांच्या अटकेनंतर मार्चमध्ये सोडण्यात आले.