श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू महामार्गावर कारमध्ये झालेला स्फोट हा सिलेंडरचा स्फोट असल्याची माहिती मिळत आहे. सँट्रो कारमध्ये हा सिलेंडर फुटला. या स्फोटात गाडीचा चेंदामेंदा झाला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटामुळे संशयाचे वातावरण पसरले आहे. गाडीचा स्फोट झाला त्यावेळी सीआरपीएफचा ताफा तिथून जात होता. स्फोटापूर्वी कारने बाजूने जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्याला ठोकर दिली. या स्फोटामुळे सीआरपीएफच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावरील बनिहालमध्ये देशातील सर्वात लांब सुरंग असणाऱ्या जवाहर टनलजवळ शनिवारी एका गाडीला जोरदार स्फोट झाला. स्फोटापूर्वी कारने बाजूने जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्याला ठोकर दिली. त्यानंतरच कारमध्ये जोरदार स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर कार चालक फरार झाला आहे. 



या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. सुरक्षादलाकडून या भागात घेराबंदी करण्यात आली असून शोधमोहिम सुरू आहे. पोलिसांकडून स्फोटानंतर फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू आहे.