Jammu Kashmir : जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात (Anantnag) दहशतवाद्यांबरोबर (Terrorist) झालेल्या चकमकीत देशाला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. अनंतनाग जिव्ह्यातील कोकेरनाग क्षेत्रात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत कर्नल (Colonel), मेजर (Major) आणि एका डीएसपीसहित (Police Officer) तीन अधिकारी शहीद झाले. शहिद अधिकाऱ्यांमध्ये कर्नल मनप्रीत सिंह यांचा समावेश आहे. कर्नल मनप्रीत सिंह यांची 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती होती आणि ते कमांडिंग अधिकारी होते. 2020 नंतर जम्मू-काश्मिरमध्ये पहिल्यांदा एखाद्या कमांडिंग अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग क्षेत्रात बुधवारी सकाळपासून सुरक्षारक्षक आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. दोनही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. यात कर्नल मनप्रीत सिंह आणि एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले. संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. आता पूर्ण परिसर सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्या आला आहे. 


काश्मिर झोनच्या पोलीस अधिकाऱ्याने ट्विटरवर अनंतनागमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर भारतीय लष्करआणि जम्मू-काश्मिर पोलीस या मिशनमध्ये सहभागी झाले. त्यांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं. मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे 12  सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सेनेचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी एक संयुक्त अभियान सुरु केलं होतं. अभियान सुरु असताना अनंतनागच्या गडुल गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंधादुंध गोळीबार सुरु केला. यात तीन अधिकारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली


याआधी जम्मू-काश्मिरमधल्या राजौरीतही सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. मंगळवारी सुरु झालेली ही चकमक दुसऱ्या दिवशीही म्हणजे बुधवारी देखील सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेलेत. तर सेनेचा एक जवान आणि एक श्वान शहीद झाले. जम्मू-काश्मिरचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. राजौरीत झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे एस सायलेंट वॉरियर केंटही शहीद झाले. त्यांनी आतापर्यंत 8 चकमकीत शौर्य गाजवलं होतं. 


दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षादलाने मोहिम हाती घेतली आहे. भारतीय सेनेने गेल्या 45 दिवसात 20 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलंय. राजोरी आणि पुंछ परिसरात हे दहशतवादी मारले गेलेत. यातले अनेक दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचंही समोर आलंय. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.