श्रीनगर: जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधील पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलाकडून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचं सत्र सध्या सुरुच आहे. सध्याच्या घडीला इथं सुरु असणाऱ्या कारवाईमध्ये 1 दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी या भागात असणाऱ्या सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. यामध्ये 11 पोलीस जखमी तर, 3 शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद ग्रुपच्या काश्मीर टायगर्सनं श्रीनगरमधील या हल्ल्याची जबाबदारी घेतली.


दरम्यान, सध्या या भागात सुरक्षा दलांनी लगेचच शोधमोहिम हाती घेतली असून, प्रत्येक गोष्टीची कसून तपासणी सुरु आहे. दोन्ही बाजूंनी सध्या जोरदार गोळीबार सुरु आहे.


16 राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या टीम मिळून ही कारवाई पूर्णत्वास नेत आहेत. 


सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी अद्यापही 2 ते 3 दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता आहे.


जम्मू काश्मीरमध्ये कायमच दहशतवदी हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण, आता पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकांवर इथे भ्याड हल्ला करण्यात आला आहे.


दहशतवाद्यांनी येथील जेवान पंथा चौक भागामध्ये असणाऱ्या पोलीसांच्या बसवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. सोमवारी हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली. हा हल्ला त्यावेळी करण्यात आला जेव्हा जवळपास 25 पोलीस कर्मचारी काम संपवून घरी परतत होते.


सशस्त्र दहशतवाद्यांनी बसवर तीन बाजूंनी हल्ला केला. तर, तिथे रंगरेथ भागामध्येही पोलीस तपासणीदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली.