श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. रविवारी पाकिस्तानकडून पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानकडून भारतीय सेनेच्या चौक्यांना तसेच रहिवाशी भागांना लक्ष करण्यात आले होते. त्यानंतर सीमेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सेनेकडूनही प्रत्युत्तर देत कारवाई सुरु करण्यात आली. अचानक सुरु झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे दहशतीचे वातावरण पसरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सेनेला दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात एका शोधमोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे सापडली आहेत. त्यामुळे याभागात दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी १७८ बटालियन सीआरपीएफ, ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या स्पेशल टीमने एक 'सर्च अॅन्ड डेस्ट्रॉय ऑपरेशन' चालवले होते. यावेळी जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रात्रांचा साठा जप्त केला होता.


याआधी १२ एप्रिल रोजी पाकिस्तानने भारतीय सेनेला निशाणा करत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.