श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार आता थांबलाय. सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीरची पोलीस यांच्या संयुक्त टीमनं हे ऑपरेशन हाताळलं. गोळीबार थांबल्यानंतर आता गावात शोधमोहिमेला सुरूवात झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे ५ वाजल्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. दोन्हीकडून हा गोळीबार बराच वेळ सुरू होता. 


ही चकमक कुपवाडाच्या हंदवाडामध्ये झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलानं २-३ दहशतवाद्यांना घेरलं होतं. सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आलीय.  


या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरक्षादलानं प्रत्यूत्तर देत गोळीबार केला. त्यात दोन दहशतवादी ठार झालेत.