जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला
जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा डौलाने फडकला.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा डौलाने फडकला. जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. आणि जम्मू-काश्मीर द्विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरला असणारा विशेषाधिकार कायमचा रद्द झाला आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक धाडसी निर्णय घेत जम्मू आणि काश्मीरमधून लडाखला वेगळे केले. कलम ३७० रद्द करण्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाजी मतदानाने कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये आता केंद्र सरकारचे थेट नियंत्रण राहणार आहे. कलम ३७० हद्दपार झाल्यानंतर श्रीनगरमध्ये सचिवालयावर तिरंगा डौलाने झळकला आहे. त्यासोबत जम्मू आणि काश्मीरचा झेंडा सुद्धा आहे.
कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. लडाखला केंद्रशासित करण्यात आले असले विधिमंडळ असणार नाही. तेथील सहकार हे चंदीगडच्या धर्तीवर असणार आहे. दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरला विधानसभा असेल आणि तेथील कामकाज दिल्ली विधानसभेनुसार असणार आहे. त्यामुळे येथे नायब राज्यपाल हे पद महत्वाचे असणार आहे.