Rajouri Encounter : जम्मू काश्मिरमध्ये भारताच्या पाच जवनांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. राजौरीत दहतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद  (5 Jawan Martyred) झाले. यात दोन कॅप्टनचा समावेश आहे. सुरक्षायंत्रणांनी केलेल्या एनकाऊंटमध्ये आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. राजोरीतल्या दरमसाल इथल्या बाजीमल परिसरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल 36 तास चकमक सुरु होती. या चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर कारीसुद्धा ठार झाला. ह सर्व दहशतवादी पाकिस्तानचे होते आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतली होती. भारतात दहशत पसवरवण्यासाठी त्यांनी सीमेवरुन भारतात घुसखोरी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण होता कारी?
कमांडर कारी हा पाकिस्तानचा नागरिक होता आणि कट्टर दहशतवादी होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कारीची ट्रेनिंग झाली होती. लष्कर-ए-तोयबामधला तो हायरँकवर होता. गेल्या वर्षभरापासून कारी आपल्या काही दहशतद्यांबरोबर राजौरी भागात सक्रीय होता. कांडी आणि डांगरी इथं झालेल्या आतंकी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. काश्मिर खोऱ्या पुन्हा दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानने कारीला पाठवलं होतं. कारी IED एक्सपर्ट होता, जंगलात राहून कट आखत हल्ले करण्यात तो एक्स्पर्ट मानला जात होता.


5 जवान शहीद
चकमकीत भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. यात दोन कॅप्टनचा समावेश आहे. तर एक मेजर आणि एक जवानही जख्मी झाले होते. या दोघांवर उधमपूर इथल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये कॅप्टन मवी प्रांजल (मँगलोर, कर्नाटक), कॅप्टन शुभम गुप्ता (आगरा, यूपी), हवालदार अब्दुल माजिद (पुंछ, जम्मू कश्मीर), लांस नायक संजय बिस्ट (उत्तराखंड) आणि पैराट्रूपर सचिन लौर (अलीगढ, यूपी ) यांचा समावेश आहे. चकमकीदरम्यान महिला आणि मुलांना वाचवताना या जवानांना वीरमरण आलं.


कॅप्टन एमवी प्रांजल
राजौरीत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांमध्ये कॅप्टन एमवी प्रांजल यांचा समावेश आहे. कॅप्टन प्रांजल 63 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. कर्नाटकतल्या मैसूर इथे राहाणारे कॅप्टन प्रांजल केवळ 28 वर्षांचे होते.  Manglore Refinery चे माजी MD व्यंकटेश यांचा तो एकुलता एक मुलगा होता. प्रांजल यांचं लग्न बंगलुरुच्या आदिती यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर त्यांची पोस्टिंग काश्मिरमध्ये झाली होती. 


कॅप्टन शुभम गुप्ता
उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथले कॅप्टन शुभम गुप्ता यांनाही राजौरीत वीरमरण आलं कॅप्टन शुभम यांचे वडिल बसंत गुप्ता हे जिल्हा कोर्टात कामाला आहेत. यावर्षी शुभमचं लग्न करण्याचा कुटुंबियांचा विचार होता. पण दुर्देवाने कुटुंबीय आपल्या मुलाचं लग्न पाहू शकले नाहीत. त्याआधीच कॅप्टन शुभम शहीद झाले. कॅप्टन शुभम यांच्या मृत्यूचं वृत्त ऐकताची त्यांची आई बेशुद्ध झाली. 


हवालदार अब्दुल माजिद
या चकमकीत जम्मू काश्मिरमध्ये राहाणारे हवालदार अब्दुल माजिद शहीद झाले. माजिद हे पॅरा कमांडो होते. त्यांचं कुटुंब भारत-पाकिस्तान एलओसीवर असलेल्या अजोट गावात राहतं. माजित यांच्यामागे पत्नी आण तीन मुलं आहेत. माजिद यांचे भाऊ जम्मू काश्मिर लाइट इन्फ्रंट्रीमध्ये सैनिक होते, 2017 मध्ये पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. 


लान्सनायक संजय बिष्ट
शहीद जवानांमध्ये उत्तराखंडमधल्या लान्सनायक संजय बिष्ट यांचा समावेश आहे. ते 19 कुमाऊं पॅरामध्ये तैनात होते. संजय बिष्ट रामगढमधल्या हली गावात राहाणारे होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. संजय बिश्त 2012 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. संजय बिश्त यांच्यामागे वडील दीवान सिंह, आई मंजू आणि एक बहिण-भाऊ आहेत. 


पॅरा ट्रूपर सचिन लौर
या चकमकीत अलीगढमध्ये राहाणारे जवान सचिन लौर यांचा समावेश आहे. शहीद जवान यांचं काही दिवसांवर लग्न होतं. सचिन यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ते राहात असलेल्या गावातही दु:खाचं वातावरण आहे.