अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा आज भारत दौऱ्यातील दुसऱ्या आणि शेवटचा दिवस आहे. दौ-याच्या दुस-या दिवशी, शिंजो आबे यांनी भारत आणि जपान यांच्यातील महत्त्वाच्या करारावर चर्चा आणि स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान अबे आणि पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर येथे एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आणि अनेक भागातील दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या कराराविषयी माहिती दिली.


पंतप्रधान मोदींनी जपानी पंतप्रधान आबेंचा सत्कार केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की मी बुलेट ट्रेनला नवीन भारताची जीवनरेखा समजतो आणि या करारामुळे नवीन अध्याय लिहिला गेला आहे. भारत आणि जपान यांच्यातील सशक्त संबंधाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, येथे राहणाऱ्या जपानी नागरिकांची संख्या वाढणार आहे. ते म्हणाले की मी भारतात अधिक जपानी रेस्टॉरंट्स उघडू इच्छितो. त्यांनी सांगितले की जपान भारतात फूड रेस्टॉरंट उघडेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की 'मेक इन इंडिया' ही जपानी लोकांसाठी उत्तम संधी आहे.