नवी दिल्ली : काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दशहतवाद्यांना कंठस्नाऩ घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहीद अफ्रिदीनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय संयुक्त राष्ट्र संघ याविषयी गप्प का बसलय असंही शाहीद अफ्रिदीनं म्हटलंय. काश्मीरच्या मुद्द्यावर याआधीही शाहीद आफ्रिदीनं वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. आफ्रिदीच्या या ट्विटला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.



कसोटी पटू गौतम गंभीरनं शाहिद अफ्रिदीची अक्कल काढून शाहीदच्या लेखी UNचा अर्थ अंडर नाईंटीन असा असल्याचं गंभीरनं म्हटलं आहे.