अमिताभ यांचं नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, राज्यसभेत का झाल्या भावूक?
Jaya Bachchan Speech in Rajya Sabha : राज्यसभेत बोलताना खासदार जया बच्चन अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच भडकल्या. नेमकं काय झालं? पाहा रिपोर्ट
Jaya Bachchan objects as Amitabh mentioned : अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांची काही वक्तव्य अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच आता सुरू असलेल्या बजेटची चर्चा संसदेत सुरू आहे. त्यावेळी बोलताना जया बच्चन यांचा राग पहायला मिळाला. राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना 'जया अमिताभ बच्चन' या नावाने पुकारताच संतप्त झाल्या. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी त्यांना त्यांच्या जागेवरून 'जया अमिताभ बच्चन' म्हटले तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर जोरदार आक्षेप घेतला.
नेमकं काय झालं?
राज्यसभेत चर्चा सुरू असताना उपसभापती हरिवंश यांनी खासदारांची नाव घेतले आणि बोलण्याची अनुमती दिली. त्यावेळी जया बच्चन यांचा नंबर आला, तेव्हा जया बच्चन यांचं नाव पुकारताना उपसभापती हरिवंश यांनी जया अमिताभ बच्चन असं नाव घेतलं. त्यावरून जया बच्चन यांना राग आला आणि त्यांनी संताप व्यक्त केला.
काय म्हणाल्या जया बच्चन?
सर फक्त जया बच्चन म्हटलं तर बस झालं असतं, पूर्ण नाव घेण्याची गरज नव्हती, असं जया बच्चन यांनी म्हणताच उपसभापतींनी हसत हसत तिला आठवण करून दिली की रेकॉर्डमध्ये तिचे पूर्ण नाव "जया अमिताभ बच्चन" आहे. परंतू. समाजवादी पक्षाच्या नेत्याने अध्यक्षांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. आता नवीन ट्रेंड निघालाय की, महिला आपल्या नवऱ्याच्या नावाने ओळखली जातील. त्यांचा कोणतंही अस्तित्व नाहीये का? असा खडा सवाल जया बच्चन यांनी विचारला. त्यानंतर राजेंद्रनगर कोचिंग अपघातावरील चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशच्या राज्यसभा खासदार जया बच्चन भावूक झाल्या.
दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरे संसदेचे अधिवेशन 22 जुलैपासून सुरू झाले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 22 दिवसांच्या कालावधीत 16 बैठका असतील. या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी 2024-2025 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर सध्या चर्चा होत आहे. जया बच्चन दीर्घकाळ बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर राजकारणात सक्रिय झाल्या. जया बच्चन या पाचव्यांदा समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत.