नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा या अमर सिंह यांना आपला गॉडफादर मानतात. त्यांना राखी बांधली तरी देखील लोकं चर्चा करणं बंद करणार नाहीत. असं वक्तव्य जयाप्रदा यांनी केलं आहे. जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, आजम खान यांनी त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपामधून बाहेर पडल्यानंतर अमर सिंह यांनी राष्ट्रीय लोक मंच पार्टी बनवली होती. पण नंतर अमर सिंह आणि जयाप्रदा यांनी  राष्‍ट्रीय लोकदल पार्टीमध्ये प्रवेश केला. अमर सिंह यांच्यासोबत संबंधांवर नकारात्मक चर्चा होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'मला जीवनात अनेक लोकांनी मदत केली. अमर सिंह हे माझे गॉडफादर आहे.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


'माझ्या जीवाला धोका'


जयाप्रदा यांनी दावा केला आहे की, 'ज्या परिस्थितीमध्ये एक महिला म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा माझ्यावर अॅसिड हल्ला आणि जीवाचा धोका होता. मी जेव्हा बाहेर पडायची तेव्हा मी आईला सांगून जायची की मी जिवंत परत येणार की नाही.' 


जयाप्रदा यांनी म्हटलं की, 'माझ्या समर्थनात कोणताच नेता समोर आला नाही. मुलायम सिंह यांनी मला एकदाही फोन केला नाही. त्यांच्या फोटोला एडीट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. तेव्हा आत्महत्या करण्याचा विचार आला होता.'


'अमर सिंह डायलिसिसवर होते. तेव्हा माझे फोटो एडीट करुन पसरवले जात होते. मी रडत होती आणि म्हणत होती की मला आणखी जगायचं नाही, मला आत्महत्या करायची आहे. पण माझ्या समर्थनात तेव्हा कोणीच आलं नाही.'


जयाप्रदा यांनी पुढे म्हटलं की, खासदार असताना देखील मला मानसिक त्रास दिला गेला. माझ्यावर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न केला. पण मणिकर्णिका सिनेमा पाहिल्यानंतर मला त्या सारखंच जाणवतं आहे. एक महिला दुर्गा अवतार देखील घेऊ शकते.'