नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांचे सहकारी जयराम रमेश यांचं समर्थन केलं आहे. शुक्रवारी त्यांनी म्हटलं की, पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना खलनायक म्हणून सादर करणं चुकीचं आहे. असं करुन विरोधक त्यांची मदतच करत आहे. सिंघवी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत जयराम रमेश यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंघवी यांनी म्हटलं की, "मी नेहमी बोलतो की मोदींना खलनायक म्हणून संबोधित करणं चुकीचं आहे. ते भारताचे पंतप्रधान आहेत म्हणूनच नाही. तर असं करुन विरोधी पक्ष त्यांची मदतच करत आहे. त्यांनी म्हटलं की, ''काम नेहमी चांगलं, वाईट किंवा साधारण असतं. कामाचं मुल्यांकन व्यक्तीच्या नाही तर मुद्द्याच्या आधारावर होतं. उज्ज्वला योजना ही अशीच एक चांगली योजना आहे.''


काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी बुधवारी म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं मॉडल पूर्णपणे नकारात्मक नाही आहे. त्यांच्या कामांचं महत्त्व स्विकार न करता आणि त्यांना नेहमी खलनायक म्हणून सादर करुन काहीच होणार नाही.



जयराम रमेश यांनी एक पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान हे वक्तव्य केलं आहे. मोदींचं काम आणि 2014 ते 2019 मध्ये त्यांनी जे केलं त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळेच ते सत्तेत पुन्हा आले. यामुळेच ३० टक्के मतदारांनी त्यांच्या बाजुने मतदान करत त्यांना पुन्हा सत्तेत आणलं.'