मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने केलेलं वक्तव्य आता एक राजकीय मुद्दा बनला आहे. याआधी संजय राऊत विरुद्ध कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं हा संघर्षाला आता राजकीय वळण लागले आहे. मुंबई काँग्रेस युनिटनेही कंगनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण काही नेते कंगनाला पाठिंबा देत आहेत.


कंगनाच्या समर्थनार्थ जेडीयू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनता दल युनायटेडने (जेडीयू) कंगना रनौतला पाठिंबा दिला आहे. बिहारमधील जेडीयू नेते संजय सिंग यांनी संजय राऊत यांचं वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हटले आहे. 'कंगना राणौत एक महिला असून तिच्यासाठी असे शब्द वापरणे चुकीचे आहे.'



संजय सिंह यांच्या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की हा मुद्दा लवकर संपणार नाही. आता या विषयावर बरेच राजकारण होईल. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्नही उपस्थित होईल आणि कंगनाच्या बहिष्काराचीही मागणी होईल. कंगनाच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. कंगना सेलिब्रिटींना लक्ष्य करत आहे. कंगनाने आता असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.