झारखंड विधानसभा निवडणूक, नक्षलवाद्यांकडून पूल उद्ध्वस्त
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत.
झारखंड : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १३ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये मतदानराजा अनेक नेत्यांचे भवितव्य निश्चित करणार आहे. यामध्ये मंत्री रामचंद्र चंद्रवंशी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रामेश्वर उरांव, सुखदेव भगत, माजी मंत्री भानू प्रताप शाही, बैद्यनाथ राम, केएन त्रिपाठी, ददई दुबे यांसारखे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण १८९ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी १७४ पुरुष आणि १५ महिला उमेदवार आहेत. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार आहे.
परंतु, मतदाना दरम्यान गुलमा जिल्हात नक्षलवादी हल्ला झाल्याची माहितीसमोर येत आहे. बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे मतदानावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशी रंजन यांनी दिली.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.