मुंबई : झारखंडच्या धनबादमध्ये न्यायाधीशांच्या मृत्यू प्रकरणात एक नवं वळणं आलं आहे. यापूर्वी ज्याला 'हिट अॅण्ड रन' केस मानलं जात होतं, ती कट रचून केलेली हत्या असल्याचं समोर येत आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांना बुधवारी पहाटे रस्त्यावरुन जात असताना एका टेम्पोने धडक दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. आरोपी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. टेम्पो चोरीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला. रामना म्हणाले की, या प्रकरणाबद्दल त्यांना काही गोष्टींची माहिती आहे.



सुप्रीम कोर्टाकडे सीबीआई चौकशीची मागणी


सिंगने हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे उपस्थित केले. मुख्य न्यायाधीश, सरचिटणीस आणि झारखंड उच्च न्यायालयाचे कुलसचिव यांच्याशी बोलणं झाल्याचं रामना यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने तपास सुरू केला आहे. यावर सिंग म्हणाले की आपण हायकोर्टात जाऊन पाहू. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. 


पुढे सिंग म्हणाले की, 'जर एखाद्या गुंडाचा जामीन रद्द झाल्याने त्यांची हत्या अशा प्रकारे केली गेली तर देशात न्याय व्यवस्थेसाठी ही खूप चूकीची गोष्ट ठरेल.'


वेळेवर उपचार मिळाला असता तर...


न्यायाधीश उत्तम आनंद बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. पहाटे पाचच्या सुमारास सुनसान रस्त्यावर एक टेम्पो  मागून येत होता आणि सरळ न्यायाधीशांच्या दिशेने जात होता. या टेम्पोने न्यायाधीशांना धडक दिली आणि तो चालक तेथून निघून गेला. आनंद तिथे जखमी अवस्थेत पडले होते. नंतर एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयात नेलं,पण त्याचा मृत्यू झाला. कित्येक तास त्याची ओळख सुद्धा झाली नव्हती.