Jharkhand Girl Student Crime News : कॉपी केल्याच्या संशयावरुन शिक्षिकेने धक्कादायक प्रकार केला. विद्यार्थीनेच कपडे उतरविल्यानंतर धक्का बसलेल्या विद्यार्थीनीने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून दिले आणि आपला शेवट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, विद्यार्थी कॉपी करत असल्याची माहिती मला मिळाली होती. यावेळी तिला एवढेच सांगण्यात आले की, हे सर्व करु नको. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडमधील जमशेदपूर येथील एका शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने तिचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले, असा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीने तिच्या ड्रेसमध्ये कॉपीचे साहित्य लपवल्याचा संशय शिक्षिकेला होता. त्यासाठी तिचे कपडे उतरविले गेले, असे सांगण्यात येत आहे. मात्र, असं काहीही झालेले नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


शिक्षिकेच्या संतापजनक प्रकारानंतर विद्यार्थीनीला मोठा धक्का बसला. तिने टोकाचे पाऊल उचलताना अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.  भाजलेल्या मुलीला तिच्या नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पीडितेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, शिक्षिकेने तिचा अपमान केला. ड्रेसमध्ये कॉपी लपवल्याच्या संशयावरुन क्लासच्या शेजारील एका खोलीत कपडे उतरवण्यास भाग पाडले. नववीच्या विद्यार्थ्याने रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थिनीचे कपडे शिक्षकाने काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही सत्यता तपासत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


गर्ल्स हायस्कूलमधील ही विद्यार्थिनीने परीक्षा संपल्यानंतर घरी गेली. त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिने स्वत:ला पेटवून घेतले. आगीत भाजलेल्या मुलीला गंभीर अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला टीएमएचमध्ये पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या शरीराचा 80 टक्के भाग जळाला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.


विद्यार्थ्याच्या मोठ्या बहिणींनी सांगितले की, लहान बहिणीची दुसऱ्या शिफ्टमध्ये सायन्सची परीक्षा होती. परीक्षा देऊन घरी परतल्यावर ती गप्पच होती. काही वेळाने त्यांनी आम्हाला आमच्या चुलत भावाला भेटायला पाठवले. यानंतर त्यांनी घरात ठेवलेले रॉकेल स्वतःवर ओतून पेटवून घेतले. तिचा आरडाओरडा ऐकून आम्ही तिथे पोहोचलो आणि कशीतरी आग विझवली.


या प्रकारानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी संतप्त कुटुंबीय आणि टीएमएचमधील रहिवाशांनी टीएमएच गाठून गोंधळ घातला. यावेळी त्यांनी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्गात मॅडमने सर्वांसमोर तिचे कपडे काढले आणि तिला मारहाण केली, यामुळे तिने स्वतःला पेटवून घेतले. परीक्षेत कॉपी केली नसल्याचे विद्यार्थिनीने सांगितले.


मुख्याध्यापकांनी आरोप चुकीचे असल्याचे सांगून ते  फेटाळले आहे. त्याचवेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, विद्यार्थी कॉपी करत असल्याची माहिती मला मिळाली होती. यावेळी तिला एवढेच सांगण्यात आले की, हे सर्व करु नको. मुख्याध्यापक म्हणाले की, मुलीचे कपडे काढलेले नाहीत, मला याची माहिती नाही.