नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना संसद मार्गावर ‘युवा हुंकार रॅकी’ काढण्यास मनाई केली आहे. मात्र जिग्नेश मेवाणी आणि आयोजक रॅली काढण्यावर ठाम आहे. जिग्नेश यांचे सहकारी अखिल गोगोई म्हणले की, ‘आम्ही रॅली करू’.


आम्हाला टार्गेट केलं जातंय- मेवाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांनी एनजीटीच्या कारणामुळे रॅलीला परवानगी नाकारली. हा वाद आता चांगलाच पेटला असून सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रॅलीला परवानगी न मिळण्याच्या मुद्द्यावर जिग्नेश मेवाणी म्हणाले की, ‘दुर्दैवी. आम्ही केवळ लोकतांत्रिक आणि शांतिपूर्वक प्रदर्शन करण्यासाठी जात होतो. पण सरकार आम्हाला टार्गेट करत आहे. एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला परवानगी नाकारली जात आहे’.



परवानगी नाहीच



दिल्ली पोलीसचे ज्वॉईंट सीपी अजय चौधरी म्हणाले की, ‘कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. एनजीटीने आदेश दिलाय की, जंतर-मंतरवर कोणतही प्रदर्शन होणार नाही. आम्ही आयोजकांना रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यास सांगितले’.


भाजपला आव्हान



पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिग्नेश मेवाणी रॅली करण्यावर ठाम आहेत. रॅलीआधीच परीसरात जिग्नेश मेवाणी यांचे पोस्टर्स दिसून येत आहेत. इतकेच नाहीतर ट्विट करून जिग्नेश मेवाणी यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.