मुंबई : सोशल मीडियावर आपल्या नेहमीच असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपलं मनोरंजन करतात. सध्या लग्नाचा सीझन सुरु असल्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर बहुंतांश लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. खरंतर लग्नात लोक अशी काही मजा मस्ती करतात जी त्यांना आयुष्य भरासाठी नेहमीच लक्षात रहातात. सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या लक्षात येईलच की, यानंतर हा क्षण ना नवरा कधी विसरणार ना त्याची बायको.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही व्हायरल व्हिडीओमधये पाहू शकता की, लग्नासमारंभातील एक कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये नवरदेव आणि नववधू आहेत. त्यावेळे गाणं देखील सुरु आहे, सर्वच जण  नाचण्याचा आनंद घेत असताना. नववधूच्या बहिणी आपल्या जीजू जवळ म्हणजेच नवरदेवा जवळ आल्या आणि नाचू लागल्या. हे पाहून नवरदेव खूप खुश झाला आणि तो देखील त्याच्या मेहुण्यांसोबत नाचण्याची मजा घेत होता.


तो त्याच्या मेहुण्यांसोबत नाचण्यात इतका व्यस्त होता की, त्याच्या लक्षातच आले नाही की, त्याचं स्वत:चं लग्न झालंय. परंतु जेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा फार उशीर झाला होता.



जेव्हा नवरदेवाने आपल्या बायकोकडे पाहिले तेव्हा, त्याला तिने असा काही लूक दिला की, नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरदेव कसा नाचता नाचता अचानक थांबला.


हे संपूर्ण प्रकरण पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की, आता हा क्षण ना ती बायको कधी विसरणार ना ती आपल्या नवऱ्याला कधी विसरु देणार


सोशल मीडियावर Wedding videos नावाच्या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो जोरदार व्हायरल होत आहे.