दारू पिऊन लग्नात पोहोचलेल्या नवरदेवानं वरमालाच्या वेळी केलं असं काम, अखेर मेहुणीकडून मिळाला चोप
अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल.
मुंबई : अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल. सध्या असंच एक प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. खरंतर लग्नाच्या दिवशी नववधू आणि तिचे घरातील मंडळी वरातीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मिरवणूक दारात येताच तिचे कुटुंबीय नवऱ्या मुलाच्या आणि त्याच्या घरच्यांच्या स्वागतासाठी तयार राहातात, त्याला पुष्पहार घालतात. परंतु अनेकवेळा वराच्या बाजूचे काही लोक वरातीत येतानाच दारु पिऊन येतात, ज्यामुळे बऱ्याचदा वातावरण खराब होतं. परंतु या लग्नात काही भलतंच घडलं आहे.
कारण या लग्नात स्वत: नवरदेव दारु पिऊन येतो आणि नशेत, संपूर्ण वातावरण खराब करतो.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका मद्यधुंद वराने लग्नाचे संपूर्ण वातावरण बिघडवले. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जयमालाच्या वेळी हा नवरदेव दारू पिऊन पोहोचतो. तुम्ही व्हिडीओमध्ये नीट पाहू शकता की, या नवरदेवाला धड आपल्या पायावर उभं देखील राहण्याची शुद्ध नव्हती. तो सारखा इकडे तिकडे पडत होता, तेव्हा त्याच्या जवळचा नातेवाईक त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होता.
अशावेळी कसंतरी करुन नववधू ही नवरदेवाला वरमाला घालते. परंतु जेव्हा नवरदेवाची हार घालण्याची वेळ येते, तेव्हा तो चुकून नववधूच्या गळ्यात हार न घालता, आपल्या मेहूणीच्या गळ्यात हार घालतो. ज्यामुळे त्याला त्याची मेहुणी मारायला सुरुवात करते आणि त्याला चांगलाच चोप देते.
हा व्हिडीओ पाहून लोकांना फार हसायला येत आहे, तर अनेकांकडून या अशा प्रथांविरुद्ध बोलले जाऊ लागले आहे.
हा व्हिडीओ बिहारचा असून @Vikki19751 नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.