बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद, बदामाच्या झाडांचे नुकसान
सफरचंदाचं मोठं नुकसान
श्रीनगर : काश्मीरमध्ये (शनिवार) आज बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कोणताच फरक पडलेला नाही. त्यामुळे सफरचंद आणि बदामाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात उंच डोगरांवर असलेल्या सफरचंदाच्या झाडांचे अधिक नुकसान झाले आहे.
बर्फवृष्टीमुळे दक्षिण काश्मीरमधील पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात असलेल्या सफरचंदांच्या झाडांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. काश्मीरच्या सफरचंद उत्पादनातील सर्वात मुख्य क्षेत्र म्हणजे पुलवामा आणि शोपिया आहे. सफरचंदाची सगळ्या लागवडीचं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यातील बर्फवृष्टी ही सामान्य बर्फवृष्टीपेक्षा सर्वाधिक होती. यामुळे झाडावर असलेल्या सर्व सफरचंदाचं आज नुकसान झालं आहे. दोन दिवस सर्वाधिक बर्फवृष्टी होत आहे.
याचा फटका फळ बाजारात होणार आहे. सफरचंदाच्या दरात वाढ होणार आहे. तसेच बदामाचे नुकसान झाल्यामुळे सुकामेवा महागणार आहे.