जम्मू कश्मीर : वारंवार तंबी तसेच कारवाई करुनही पाकिस्तानकडून 'काड्या करण' थांबत नाही. यावेळेस पाक सेनेने कडून नौशेरात येथे पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये १ नागरिक जखमी झाला आहे.


नागरिक जखमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात पाकतर्फे छोटी हत्यार आणि मोर्टारचा उपयोग करण्यात आला. सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्यात एक स्थानीक नागरिक जखमी झाला आहे.


जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


भारत देणार उत्तर 


 पाक कडून झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक पोलिसांना संबंधित ठिकाणी ग्रेनेट सापडले.


हे ग्रेनेट पाकिस्तानकडून फेकण्यात आले होते. जे जवळच्या घरावर जाऊन पडले. त्यामूळ घराचे छप्पर पूर्णपणे कोसळले.


भारतीय सेनेकडून याचे जशास तसे उत्तर दिले जात आहे.