नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहासमोर  विद्यार्थ्यांनी अर्धनग्न होऊन परेड काढली. ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 


विद्यार्थीनींकडून परेडची तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हिंदुस्तान"मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, होळीच्या दिवशी 29 मार्चला जेएनयूमध्ये परेड काढण्यात आली होती. विद्यार्थीनींनी हा परेडची तक्रार Sexual Harassment स्वरूपात केली आहे. या घटनेची तक्रार विद्यापीठ प्रशासनाने नोंदवली आहे.


होळीच्या दिवशी अर्धनग्न परेड


विद्यार्थीनींच्या मते, २९ मार्च रोजी दुपारी मुलीच्या वसतीगृहासमोर काही विद्यार्थ्यांनी अर्धनग्न होऊन परेड काढली.


विद्यार्थी संघाचा जेएनयू प्रशासनावर आरोप


जेएनयूच्या विद्यार्थी संघाने विद्यापीठ प्रशासनावर अशा प्रकरणांवर दूर्लक्ष करीत असल्याचे आरोप केले आहेत. आणि अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. असे असले तरी विद्यापीठाकडून याबाबतीत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.