Jobs in Railway  : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंड बोर्डाने (RRC Job 2021) ही पदभरती काढली आहे. क श्रेणीतील पदांसाठी ही पदभरती आहे. विशेष म्हणजे ही पदभरती खेळाडूंसाठी आहे. स्पोर्ट्स कोट्यातून ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. rrc-wr.com या वेबसाईटवरुन इच्छूक अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची सुरुवात ही 4 ऑगस्टपासून झाली असून शेवटची तारीख ही 3 सप्टेंबर आहे. (Job opportunities in Railways from Sports Quota know details and how to apply) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण 21 पदांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे खेळातील किमान प्राविण्य असणं बंधनकारक आहे. त्या अटी काय आहेत, हे अधिकृत वेबसाईटवरुन जाणून घेता येईल.


अर्ज कोण करु शकतो? 


विविध पदांसाठी वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये क्रीडा प्राविण्यासह उमेदवार हा किमान 12वी पास ते पदवीधर असावा. 18 ते 25 वर्षांमधील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयाच्या अटीत सूट असणार आहे.   


निवड कशी होणार?


उमेदवारांची नियुक्ती ही त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित असणार आहे. सोबतच शैक्षणिक पात्रता आणि मूल्यांकन यांनाही महत्त्व असणार आहे. सर्वात आधी उमेदवारांना चाचणी द्यावी लागेल. त्या फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड केली जाईल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार वेतन मिळणार आहे.